रत्नागिरी, दि. २२ : रत्नागिरी मध्ये राजकीय भूकंप सुरु असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडला असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा चिटणीस माजी तालुकाध्यक्ष, कुवारबावचे माजी सरपंच सचिन उर्फ बबलू कोतवडेकर यांनी आज पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कशाला मोठा धक्का बसला आहे.
रत्नागिरी राजकीय भूकंप होत असून शिवसेनेकडे येणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या कामावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला.गावाच्या विकासासाठी आम्ही पालकमंत्री यांचे नेतृत्व स्वीकारून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या प्रवेशा दरम्यान किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी उपस्थित होते.








