वरवडे येथे ‘खेळ पैठणी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; निलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

रत्नागिरी, दि. २७ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. निलेश भगवान सांबरे यांच्या येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत वरवडे येथे महिलांसाठी ‘खेळ पैठणी’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

२६ मार्च २०२६ रोजी वरवडे ग्रामपंचायत हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. रत्नागिरी विभागाच्या वतीने राज्य सचिव श्री. केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर आणि तालुका अध्यक्ष श्री. मंदार नैकर यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत मोफत आरोग्य शिबिरे व महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य सचिव श्री. केदार चव्हाण आणि श्री. अमर राऊत यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचे नियोजन वाटद-खंडाळा विभाग प्रमुख श्री. दीपक सांबरे यांनी केले. व्यासपीठावर उपसरपंच श्री. गजानन हेदवकर, श्री. संतोष बोरकर, वरवडे गावचे प्रथम मानकरी श्री. संदीप विचारे, श्री. केशव बलेकर, मास्टर सीआरपी सौ. अनुजा सावंत, नारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. संजना मोहिते, खजिनदार सौ. अंतरा मोहिते तसेच रत्नसिंधू न्यूज मीडियाच्या संस्थापिका व संपादिका वर्षा राजे निंबाळकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. साहील गोरे यांनी केले. महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. ‘खेळ पैठणी’ स्पर्धेत सौ. श्रुतिका अनिरुद्ध डोरलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सौ. शमिका समीर गैमर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

वरवडे गावात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपस्थित महिलांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच संस्थापक श्री. निलेश सांबरे यांचे आभार व्यक्त केले.

आणखी वाचा