संगमेश्वर तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा ; जोरदार प्रचार सुरु

संगमेश्वर, दि. १७ (अभिजित जाधव): संगमेश्वर तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महायुतीतील उमेदवार श्री शेखर निकम सर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आठवले गटाचे कार्यकर्ते निकम सर यांचा तालुक्यात जोरदार प्रचार करत आहेत.
संगमेश्वर तालुका ३ मतदारसंघात विभागला असून यातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी (अजित पवार गट) श्री शेखर निकम आहेत, रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार-जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत (शिवसेना- एकनाथ शिंदे गट) आहेत, तर लांजा-राजापूर- साखरपा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री राजन साळवी (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
हे विद्यमान आमदार आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीचा घटक पक्ष असल्याने संगमेश्वर तालुक्यातील पक्ष संघटनेने महायुतीचे अधिकृत उमेदवार चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री शेखर निकम सर आणि रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार-जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना जाहीर पाठिंबा देऊन जोरदार प्रचार सूरु ठेवला आहे. तसेच लांजा-राजापूर- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमदेवार उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांना जिंकवून देण्यासाठी आठवले गट तालुक्यात जोरदार प्रचार करत आहे.
महायुतीचे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतिने या तीनही उमेदवारणा चांगले मताधिक्य देणार असे आरपीआय आठवले गटाचे तालुकाप्रमुख श्री विक्रम जी मोहिते यानी संगितले.
प्रचारदरम्यान सर्व गावगावत जाऊन आरपीआय आणि महायुतीने केलेली विकास कामे आणी भविष्यातील
विकासाबाबतची बाबतीत धोरणे समजावून संगितली जात आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराची धुरा RPI तालुकाध्यक्ष श्री. विक्रम मोहिते यांच्या खांद्यावर आहे, त्यांच्या सोबत कार्याध्यक्ष राजेंद्र मोहिते, अभिजीत जाधव, मिलिंद सावंत, विजय तांबे आणि सर्व कार्यकर्ते उपस्थीत जोरदार प्राचार करीत आहेत.

आणखी वाचा