मुंबई दि. २३ : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत सर्वसमावेशक भूमिकेतून काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्रदीपक यशासाठी मतदानरुपी आशीर्वाद दिल्याबद्दल राज्यातील तमाम नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दरम्यान राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींनी हाती घेतलेली ही लढाई आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने जिंकली असून महिला सन्मानाचा आणि विजयाचे प्रतीक असणारा ‘गुलाबी रंग’ आज राज्यभर मोठ्या उत्साहात उधळला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.
हे दैदिप्यमान यश राज्यातील जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवार
१) अमळनेर – अनिल पाटील – विजयी
२)अमरावती शहर – सुलभा खोडके – विजयी
३) अर्जुनी – मोरगाव – राजकुमार बडोले – विजयी
४) अहेरी – धर्मरावबाबा आत्राम – विजयी
५) पुसद – इंद्रनील नाईक – विजयी
६) लोहा – प्रतापराव पाटील – चिखलीकर – विजयी
७) वसमत – राजू नवघरे – विजयी
८) पाथरी – राजेश विटेकर – विजयी
९) कळवण – नितीन पवार – विजयी
१०) शिरूर – ज्ञानेश्वर कटके – विजयी
११) इंदापूर – दत्तामामा भरणे – विजयी
१२) बारामती – अजित पवार – विजयी
१३) येवला – छगन भुजबळ – विजयी
१४) सिन्नर – माणिकराव कोकाटे – विजयी
१५) निफाड – दिलीपकाका बनकर – विजयी
१६) दिंडोरी – नरहरी झिरवाळ – विजयी
१७) देवळाली – सरोज अहिरे – विजयी
१८) इगतपुरी – हिरामण खोसकर – विजयी
१९) शहापूर – दौलत दरोडा – विजयी
२०) अणुशक्तीनगर – सना मलिक – शेख – विजयी
२१) श्रीवर्धन – अदितीताई तटकरे – विजयी
२२) आंबेगाव – दिलीप वळसे पाटील – विजयी
२३) भोर – शंकर मांडेकर – विजयी
२४) मावळ – सुनिल शेळके – विजयी
२५) पिंपरी – अण्णा बनसोडे – विजयी
२६) हडपसर – चेतन तुपे – विजयी
२७ ) अकोले – डॉ. किरण लहामटे – विजयी
२८) कोपरगाव – आशुतोष काळे – विजयी
२९) पारनेर – काशिनाथ दाते – विजयी
३०) अहमदनगर शहर – संग्राम जगताप – विजयी
३१) गेवराई – विजयसिंह पंडित – विजयी
३२) माजलगाव – प्रकाश सोळंके – विजयी
३३) परळी -धनंजय मुंडे – विजयी
३४) अहमदपूर – बाबासाहेब पाटील – विजयी
३५) उदगीर – संजय बनसोडे – विजयी
३६) फलटण – सचिन पाटील – विजयी
३७) वाई – मकरंद पाटील – विजयी
३८) चिपळूण – शेखर निकम – विजयी
३९) कागल – हसन मुश्रीफ – विजयी
४०) तुमसर – राजू कारेमोरे – विजयी
४१) सिंदखेडराजा – मनोज कायंदे