संगमेश्वर, दि. ३० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील तुरळ येथे गोव्याहून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी आराम बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन डंपरला जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात बस चालक तसेच बस मधील दोघे असे तिघेजण जखमी झाले असून, झालेल्या तिहेरी अपघातात तिन्ही गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात काल. मध्यरात्री १.३० च्या सुमारास झाला.