महिलांना कौटुंबिक हिंसाचाराबाबत न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव

स्त्रीला मानव जातीची माता म्हणून संबोधले जाते. स्त्री राणरागिनी आहे. ती वासल्याचे प्रतीक आहे तर स्त्री ही कर्तृत्वाच्या उंच शिखरावर विराजमान होणारी नारी शक्ती आहे. अशीच एक रणरागिणी महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी गेली दहा वर्षे यशस्वी कार्य करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात महिला संरक्षण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या माधवी अजिता अरुण जाधव यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महिलांना कौटुंबिक उमटवला आहे. हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत मार्गदर्शन करताना अनेक संसार जोडण्याचे काम सुद्धा केले आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाला निश्चित सलाम आहे.
श्रीमती माधवी अजिता अरुण जाधव या बालपणापासूनच आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सेवा कशी करावी याचे धडे त्यांनी गिरवले आहेत. सावर्डे चिपळूण येथे वास्तव्यास असणाऱ्या माधवी जाधव यांचे वडील अरुण जाधव हे सुद्धा शासकीय सेवेत सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर काम करत होते. त्यामुळे कुटुंबातच लहानपणापासून त्यांना शासकीय सेवेचे बाळकडू मिळाले आहे. एक जिद्द आणि प्रेरणा मिळाली आहे. माधवी यांनी शिक्षण घेताना त्यांनी डिप्लोमा कंप्यूटर इंजीनियरिंग, बी इ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, बीएससी कॉम्प्युटर सायन्स, एमएसडब्ल्यू , LLB सुद्धा करत उत्तम शैक्षणिक पात्रता धारण केली. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला तीन वर्षे इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. ही सेवा करत असताना त्यांनी इतर परीक्षा देत पुढील वाटचाल सुरू ठेवली होती. त्यांची 19 जानेवारी 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात महिला संरक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यांनी चिपळूण गुहागर, मंडणगड, खेड आणि दापोली या ठिकाणी 2019 ते 20 21 दरम्यान अतिशय मेहनतीने सेवा केली आहे. ही सेवा करत असताना महिला संरक्षण अधिकारी म्हणून गेली दहा वर्षे काम करताना त्यांनी कित्येक महिलांच्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडविल्या आहेत. वय 14 पासून पुढे अगदी साठी पर्यंतच्या सर्व महिलाना त्यांनी मार्गदर्शन करत वैवाहिक जीवन असे सुधारावे आणि कौटुंबिक समस्या कशा हाताळण्यात याव्या याचे समुपदेशन दिले आहे.
माधवी जाधव यांचा स्वभाव मुळातच मन मिळावू असल्याने त्यांनी प्रत्येक महिलेला होणारा त्रास, अन्याय, त्याच्या वेदना व त्यांचे दुःखाचे स्वरूप समजून घेतले आहे. अशा महिलांना समुपदेशन करत त्यांच्यामध्ये एक नवीन उमेद आणि प्रेरणा निर्माण करण्याचे मोठे काम सुद्धा माधवी जाधव यांनी केले आहे. एका स्त्रीचे अस्तित्व त्यांनी जवळून पाहत त्यांना समजून उमजून घेत न्याय मिळावा यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. त्यांनी मुलीनं शाळेत जाऊन स्व संरक्षण कसे करावे याचे धडेही दिले आहेत. त्यांनी गरजू गरीब महिलांना मदतीचा हात सुद्धा दिला आहे.
कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत त्यांनी सुमारे 250 पेक्षा जास्त पीडित महिलांच्या केसेस न्यायालयात दाखल केले करत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे काम करत असताना त्यांना अनेक वेळा मानसिक त्रास सुद्धा सोसावा लागला. मात्र आपल्या ध्येयापासून विचलित न होता त्यांनी महिला संरक्षण अधिकारी म्हणून अतिशय उत्तम कामगिरी बजावलेली आहे. त्यांनी स्वतच्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष देत कौटुंबिक जबाबदारी पार पडली आहे. त्यांचे खऱ्या अर्थाने त्यांचे वडील अरुण जाधव आणि आई अजिता अरुण जाधव हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्या यशामध्ये कुटुंबाचा सुद्धा मोठा आधार आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक महिला आपल्या समस्या घेऊन नेहमी येत असतात. या सर्वांच्या अशा समस्या ऐकून महिलांचे वैवाहिक जीवन न तुटता देत ते जोडण्याचे कार्य त्या करतात.

आता पर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी 2020 मध्ये “जिजाऊ सन्मान” पुरस्कार दिला. त्याचबरोबर महाराष्ट्र मर्दानी, कोविड योद्धा असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक स्त्रियांवरती होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी लेख लिहिले आहेत. 40 लेख त्यांनी वृत्तपत्रातून लिहून एक वेगळीच महिलांच्या संदर्भात जनजागृती केली आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी वरती प्रकाश टाकताना निश्चितच या रणरागिनीच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

आणखी वाचा