सिडको महामंडळाची आजवरची सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना, नवी मुंबईत सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दसऱ्यापासून सुरू झालेली एकूण ६७,००० घरांच्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतील २६,००० घरांची ऑनलईन नोंदणी येत्या ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्यात नवी मुंबईच्या प्रमुख ७ नोड्समधील रेल्वे, बस आणि मेट्रो स्थानकांसारख्या मोक्याच्या ठिकाणावर साकारत असलेली ही महागृहनिर्माण योजना अतिशय किफायतीशीर किमतीत घरे उपलब्ध करून देते. या अपूर्व योजनेविषयी माहिती जाणून घ्या.
“ऑनलाइन नोंदणी” प्रक्रियेसाठी सिडकोने https://
.com हा विशेष पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर इच्छुक खरेदीदारांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सहज व सुलभ करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधने आणि माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अर्जदाराने एकदा नोंदणी केल्यावर, ती केवळ पहिल्या टप्प्यांतील २६००० घरांसाठीच नव्हे, तर ६७००० घरांची ही संपूर्ण योजना पूर्ण होईपर्यंत ग्राह्य असणार आहे.
दोन प्रमुख आर्थिक गट
ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांना प्रामुख्याने लाभ देणारी आहे. या योजनेत EWS प्रवर्गातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजने (PM
AY) अंतर्गत रु. २.५ लाखांचे अनुदान मिळू शकते. या योजनेतील घरे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) या संकल्पनेवर आधारित आहेत. हे गृहनिर्माण प्रकल्प रेल्वे, मेट्रो आणि बस स्थानकांच्या जवळच्या खारघर, वाशी, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल आशा सात प्रमुख नोड्समध्ये उभारलेले आहेत.
डिजिटल सोडत अर्जदारांसाठी उचललेले सकारात्मक नवे पाऊल











