मुंबई, दि. ५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थानी दोघांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने या नियुक्त्या जाहीर केल्या. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोर नियुक्तीपत्र ठेवत अभिवादन केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला आणि युवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला व युवक आघाडीच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.








