मुंबई दि. १८ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने पक्षाच्या मुख्य संघटक कार्यक्रम आ
णि क्रियान्वयन विभाग सेलच्या प्रभारीपदी अविनाश काकडे यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी प्रविण खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटना वाढविण्यासाठी अविनाश काकडे व प्रविण खरात यांचे सहकार्य लाभेल,असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी यावेळी व्यक्त केला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते आनंद परांजपे उपस्थित होते.








