भारतीय बौद्ध महासभेतर्फे माता रमाई आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी, दि. ०८ : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी जिल्हा व तालुका महिला विभाग यांच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव आज (दि. ८ फेब्रुवारी) जिल्हा रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. दीपाली जाधव होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिवानी माने व औषध निर्माण अधिकारी सौ. स्वप्नाली जाधव उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक जाधव, कोषाध्यक्ष शिवराम कदम, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीचे सल्लागार सुनील आंबूलकर, अशोक जाधव, श्री. वासनिक आदींनी मार्गदर्शन केले. त्यांनी माता रमाई आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागमय जीवनकार्याचा गौरव करून महिलांनी शिक्षण, संघटन व समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा स्मिता कांबळे, उपाध्यक्षा दीपाली जाधव, खजिनदार मानसी तांबे, सरचिटणीस अवंतिका कांबळे, तालुका अध्यक्षा अस्मिता कांबळे, तालुका उपाध्यक्षा निलिमा जाधव, तालुका कोषाध्यक्ष विनया जाधव, तालुका सहकोषाध्यक्ष स्वाती कांबळे, तालुका सचिव अर्चना पवार, सदस्य अंजिरा आयरे, शहर शाखा अध्यक्ष दर्शना कांबळे, सल्लागार भारती पवार व कुवारबाव शाखाध्यक्षा प्रीती जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सावंत यांनी केले.

आणखी वाचा