पोलादपूर, दि. २९ (शैलेश पालकर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाने नवे पर्व युवा सर्व या संकल्पनेतून 1 सप्टेंबर 2026 रोजी पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये युवा संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनास आयपीएस अधिकारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत असे पत्रिकेद्वारे आयोजकांनी कळविले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व रायगड विभाग प्रचार प्रमुख तसेच राज्याचे वित्त विभागाचे उपसंचालक आनंद बिंदू माधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंतच्या या युवा संमेलनामध्ये प्रारंभी अल्पोपहार, सामूहिक पखवाज वादन तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील सर्व युवा वर्गाने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पोलादपूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले आहे.








