मुंबई, दि. १८ : केरेला कोवलम येथे दिनांक 7 ते 9 जून दरम्यान संपन्न झालेल्या 12 व्या नॅशनल चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये मुंबई च्या कुमारी जान्हवी जगदीश चौहान हिने फायनल राऊंड मध्ये सिल्वर मेडल पटकवून रशिया मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल चेस बॉक्सिंग स्पर्धेत जान्हवी चे सिलेक्षण (सिलेक्ट) झाले आहे. जान्हवी ने कोच राज आणि कृष्णा सोनी यांच्या मार्गदर्शाखाली नॅशनल चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप या क्रीडा स्पर्धेत उतुंग कामगिरी करीत फायनल राऊंड मध्ये सिल्वर मेडल जिंकले तिच्या ह्या यशामुळे रशिया मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल चेस बॉक्सिंग स्पर्धेत जान्हवीचे सिलेक्षण झाल्याबद्दल जानवी वर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. के.ई.एस. कॉलेज मध्ये 14 वी आर्ट्स ची विद्यार्थी असलेल्या जान्हवीने आजवर अनेक स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावत अनेक मेडल जिंकले आहेत.
रेस कोर्स परिसरात राहणाऱ्या जान्हवीचे वडील जगदीश महानगरपालकेतील कर्मचारी असून आई गृहणी आहे. जान्हवी ने आजवर 25 मेडल जिंकले असून 6 वेळा नॅशनल चॅम्पियन खेळले आहे. तर 2 वेळा फायनल मध्ये सिल्वर पटकावले आहे. इंटरनॅशनल स्पर्धेत कलकत्ता येथे वर्ल्ड चॅम्पियन (गोल्ड मेडल), आणि तुर्की मध्ये फायनल स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले आहे.








