रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी) : क्रिडा व युवक संचालयालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रिडा परीषद द्वारा आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धा जिल्हा क्रिडा कार्यालय रत्नागिरी मारुती मंदीर येथे दिनांक २८ व २९ नोव्हेबर २०२३ रोजी संपन्न झाली . स्पर्धेचे उदघाटन शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय कॅरमपटू रियाज अकबरली यांच्या हस्ते करणार आला . या प्रसंगी जिल्हा क्रिडा अधिकारी ( प्रभारी ) मा . विजय शिंदे, तालुका क्रिडा अधिकारी विशाल बोडके, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते व प्रमुख पंच सागर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींचा गटात स्वरा सुरेश मोहिरे व १७ वर्षाखालील गटात ओम दिनेश पारकर यांनी विजेतेपद मिळवले. १७ वर्षाखालील मुलींचा गटात गुंजन आशिष खवळे , समीरा सचिन शिंदे व रिया निलेश वडके यांनी अनुक्रमे दोन तीन व चार क्रमांक मिळवला. १४ वर्षाखालील मुलांचा गटात द्रोण मोहन हजारे, मिझान आदम साटविलकर व सोहम राकेश बुटाला यांनी अनुक्रमे तिन पाच व सहा क्रमांक मिळवला. १९ वर्षाखालील मुलींचा गटात मधुरा दर्शन देसाई हिने तिसरा क्रमांक मिळवला. हिंगोली येथे होणारा राज्य शालेय कॅरम स्पर्धेत कोल्हापूर विभाग तर्फे निवड झालेल्या ३६ खेळाडूं पैकी रत्नागिरी जिल्हातील १६ खेळाडूंची निवड झाली आहे हे रत्नागिरी जिल्हासाठी भूषणः आहे. निवड झालेला सर्व खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे अभिनंदन व राज्य शालेय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा .
रत्नागिरी जिल्हातील निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे-
१४ वर्षाखालील मुली १) स्वरा सुरेश मोहिरे २) स्वरा मिलिंद कदम ३) सेजल सुभाष जाधव
१४ वर्षाखालील मुले १) द्रोण मोहन हजारे २) मिझान आदम साटविलकर ३) सोहम राकेश बुटाला
१७ वर्षाखालील मुली १) गुंजन आशिष खवळे २) समीरा सचिन शिंदे ३) रिया निलेश वडके
१७ वर्षाखालील मुले १) ओम दिनेश पारकर २) हर्ष मिथून शिवगण
१९ वर्षाखालील मुली १ )मधुरा दर्शन देसाई २) श्रावणी विजय कोलगे ३) पायल मंगेश येलये
१९ वर्षाखालील मुले १) अली अब्युस समद पाटणकर २) माज हमीद देसाई








