रत्नागिरी जिल्ह्यातील जलसा मंडळातील कलाकारांचा व कलाक्षेत्रातील कलावंतांचा संगमेश्वर मध्ये संपन्न होणार

कडवई , दि. १६ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील जलसा मंडळातील कलावंतांचे जिल्हास्तरावर संघटन व्हावे, जलसा लोककलेला राजाश्रय प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने गेली चार वर्षे एक रात्र निळ्या पाखरांची जिल्हास्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा व नाट्य अभिनय स्पर्धेच्या माध्यमातून कार्यरत असून  जिल्ह्यातील जलसा मंडळाचे संघटन व्हावे, एकमेकांचे ऋणानुबंध अधिक द्रुढ व्हावे यासाठी जिल्ह्यातील कार्यान्वित असणार्या व नव्याने निर्मिती होणार्या जलसा मंडळाची एकत्रित माहिती करण्याचं काम चालू आहे.
जिल्ह्यातील कार्यान्वित जिल्हा मंडळातील  कलावंतांच्या उपस्थिती मध्ये नव्या जिल्हा संघटनेचे नाव घोषित केले जाणार असून; नूतन जिल्हा कमिटी घोषित केली जाणार आहे.
यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जलसा मंडळातील कलाकारांनी व विविध कलेत पारंगत असणाऱ्या कलावंतांनी  रविवार दि.२० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह संगमेश्वर या ठिकाणी उपस्थितीत रहावे.
या जिल्हास्तरीय स्नेह मेळाव्याला  बहुसंख्य जलसा कलावंतानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी मनोज जाधव,लोवले, दिपक पवार,देवरूख, राजेंद्र मोहिते,उमरे, युयुत्सु आर्ते,देवरूख, विक्रम मोहिते,उमरे, संतोष  जाधव,लोवले, धर्मेंद्र कदम,माखजन, संदिप जाधव,लोवले यांनी आवाहन केले आहे.

आणखी वाचा