माणसं त्यांचे वागणे – बोलणे, स्वभाव, वैचारिक बैठक आणि भावना व्यक्तिपरत्वे भिन्न असणं स्वाभाविक आहे. ही निरक्षण करताना विशेष असे जाणवले की असंख्य भिन्न माणसांमध्ये ही अश्रू दुःख, हास्य – आनंद, समाधान, चिंता, काळजी, प्रेम, माया, लोभ राग द्वेष या भावना कमी अधिक प्रमाणात का होईना पण सारख्या असतात.माणसांच्या भावनांचा गुंता सोडवत असताना किंवा यावर निरीक्षणे नोंदवताना क्षणभंगुर आयुष्यात हास्य, हसणं असेल तर नक्कीच काही गोष्टी सुखकर होतील हे निश्चित.स्मितहास्य, हास्य हसणं, हसना, लाफ हेच तर प्रसन्न चेहऱ्यावरचं आणि समाधानी जगण्यातल गुपित, पण कसे आहे हल्ली स्माईल आणि लाफ हे ईमोजी मधून व्यक्त होण सुरू आहे तिथे खळाळून मनसोक्त हसणं दुरापास्त झालेय. कॉमेडी शो हे आमच्या हसण्याच कारणं बनले आहे ते ही काही चुकीचे नाही पण दिवसभर एरंडेल प्यालेसारखा चेहरा आणि काय हसायचे ते फक्त एक तासात हसून स्ट्रेस रिलीज करा.हे काहीसे गमतीशीर वाटते मला. नात्यांमधील सहवासात कुटुंब,मित्र मैत्रिणी,सहकारी यांच्यामधे ही सहज हसणं कित्येक जणांना येते फारच कमी बोटावर मोजण्याइतके हो ना.
दैनंदिन जीवनात व्यवहारिक असणं, शिस्तीचे, धाक दाखवून जगणारी ही व्यक्तिमत्व आहेत त्या खोलात फारसे मला जायचे नाही तर हसणं विसरून गेलेल्या प्रत्येकास जरूर सांगावे वाटतं आहे की समस्या अडचणींवर मात करून म्हणजेच हसून बोलणं आणि हसून सोडण हीही एक कला आहे. जेव्हा बालकाचा जन्म होतो त्यावेळेस त्याला दोनच गोष्टी येत असतात ते म्हणजे हास्य आणि रडू पण कोणतेही बाळ जितक्या वेळेस रडते त्यापेक्षा अधिक वेळेस हसते ते हसणं इतका गोड असतं की त्याची तुलना होऊच शकत नाही. असे हे बाळ मोठे मोठे होते तसे त्याच्या चिंता वाढत जातात आणि ते हसणं विसरत पण हेच तर टाळायचे आहे. हसण्यावर अनेक संशोधन झाली हसण्यामुळे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम समोर आले. हसण्यामुळे मानसिक आणि शारीरिक क्षीण निघून जातो, प्रसन्न वाटते, उत्साह येतो, सकारात्मकता येते. थोडक्यात हसणं हा एक रामबाण उपाय आहे.
प्रथम वैज्ञानिक दृष्टया हसण्याचे महत्व ते म्हणजे मानवी शरीरामध्ये अनेक हार्मोन तयार होत असतात त्यामधे काही हॅप्पी हार्मोन जसे की डोपामाइन सेरोटोनिन, ऑक्सिटोसीन, एंडोर्फिंन. प्रत्येक हार्मोन बद्दल मी काही लीहणार नाही फक्त हसण्याने काय होते हेच मला अपेक्षित असल्यामुळे, जेव्हा व्यक्ती आनंदी असते त्यावेळेस एंडोर्फिंन हार्मोन तयार होते ,हसण्यामुळे ताण कमी होतो आनंदी आणि सकारात्मक परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. रक्ताभिसरण व्यवस्थित होते,हृदय मजबूत करते थोडक्यात काय तर laughter is the bestest medicine. स्मित हास्य असणारा चेहरा पाहूनच प्रसन्न वाटते. हसरा चेहरा माणसं जोडतो हसणं आशावाद वाढवतो असे हे हसणं. आता थोडेसे हसण्याचे माझ्या आयुष्यातील स्थान याबाबतीत थोडेसे.
मला स्वतःला प्रचंड हसायला आवडते त्याचे कारण ही तसेच आहे माझ्या आई -पप्पांच्या दोघांच्या कुटुंबामध्ये असलेले खेळकर वातावरण आणि एकत्र कुटुंब त्यामुळे सतत एकमेकांमध्ये मिसळून बोलता बोलता कोणत्याही गोष्टीवर आम्ही सगळी भावंडं , आणि सगळेच खळखळून तासनतास हसू शकतो.अगदीच सांगायचे तर मी आणि माझी मम्मी आम्ही सहज गप्पा मारताना ही खूप वेळ हसण्यात जातो, नाजूक हसण मला जमत नाही हे एक थोडी सल आहे पण हसावे असे की आपल हसणं पाहून समोरच्याने कारण न विचारता हसावे असे माझे स्पष्ट मत कारण मला फक्त प्रचंड हसता येते अम्ही सगळे भाऊ बहीण आणि माझ्या आयुष्यात असलेल्या मैत्रीणी काहीतरी जोक्स किंवा खेचण, गंमत करता हाहाहाहा कधी सुरू होते ते कळणार नाही. असे म्हणतात ही ज्या घरातून मुलींचा आणि बायकांच्या हसण्याचे आवाज बाहेर ऐकू येतात ते सुखी घर. आणि नक्कीच हे सत्य आहे.या अशा हसण्याची खरे तर ऑफिस मध्ये किंवा प्रोफेशनल ठिकाणी खूप वेळ पंचायत झालीय पण निभाव पण लागलाय असो.
थोडक्यात इतकेच सांगायचे आहे की हसण्यासाठी कोण हास्य क्लब किंवा कॉमेडी शो पाहण्याची गरज मला तरी नाही. पण हास्य हे आतून, मनापासून खळखळून आले पाहिजे, कधी स्वतः पाय घसरुन पडल्यानंतर ही हसता यायला हवे काही बोलण्यात चूक झाली तर स्वतःवर ही हसण्याचे कसब हवे. यात उगाचच दुसऱ्याची खिल्ली उडवताना हसणं हे काही चांगल्या मनाच द्योतक नव्हे. वपु म्हणतात रडणं भोगायच असतं आणि हसणं उपभोगायाच असतं.काही विनोदवीर, कलाकार असेही आहेत की त्यांनी हसविण्यासाठी जन्म आपुला… यामधे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर यांच्यामधील विनोद करण्याची सहजता भावते.असे काही प्रतेकाच्या आयुष्यात एखादा व्यक्ती तरी असतो तो नेहमी विनोद सांगण्याच आणि हसवण्याच काम करत असतो आणि त्यांच्याशिवाय मैफिल ही अपूर्ण असते हो न.
हसण्यासाठी जन्म आपुला असे म्हणत एक गोड स्मित हास्य तर आता दिलेच पाहिजे कारण आनंदी राहणं हे फक्त आणि फक्त स्वतःच्या हातात आहे. यामुळे नातेसंबध सुधरण्यास मदत होते एखादा क्षण चित्रबद्ध करत असताना ही काही सेकंदभर स्माईल प्लीज तंतोतंत पाळतो कारण तो फोटो चांगला यावा म्हणून मग हेच जर प्रत्येक क्षणाला पालन केले तर आयुष्य ही खूप चांगल्या फ्रेम फिट होईल. तूर्तास..
हँसते हँसते कट जाये रास्ते
ज़िंदेगी यौंही चलती रहे
खुशी मिले या ग म बदलेंगे ना हम
दुनिया चाहे बदलती रहे….









